Ahmednagar : Corona Updates : नगर शहरात १३ जणांना कोरोना; जिल्ह्यात २० रुग्ण

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नगर : आज २० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगर शहरात भराडगल्ली येथे ०६, तोफखाना ०४, शास्त्रीनगर ०१, सातभाई मळा ०१ आणि गंजबाजार येथे ०१ आणि गवळी वाडा (भिंगार) ०१ येथे हे रुग्ण आढळून आला.

राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे ०१,  रानेगाव (शेवगाव) ०१, जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला. कर्जत तालुक्यातील माही जळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी एक आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एक रुग्ण आढळून आला. जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्ण संख्या २०३ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ६३८ जणांना कोरोना झाला आहे. ४१८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज १८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात, नगर मनपा १०, संगमनेर ०४, राहाता ०३ आणि नगर ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here