New Education: एम. एम. आय. टी. महाविद्यालयात मेकॅट्रॉनिक्‍स अभियांत्रिकीची नवी शाखा…

राष्ट्र सह्याद्री । पुणे:

मेकॅट्रॉनिक्‍स अभियांत्रिकी शाखेमध्ये रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, दूरसंचार, प्रणाली, नियंत्रण आणि उत्पादन अभियांत्रिकीचे संयोजन समाविष्ट आहे. उद्योग आणि उत्पादनात स्वयंचलित रोबोट तयार करण्यात मेकॅट्रॉनिक्‍स अभियांत्रिकी शाखेची आवश्यकता असणार आहे. हीच आवश्यकता ओळखून लोहगाव येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये
मेकॅट्रॉनिक्‍स अभियांत्रिकी या शाखेच्या अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


सदर शाखेसाठीच्या समितीवर डॉ. मुकुल सुतावणे, डॉ प्रशांत बारटक्के शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, डेप्युटी डायरेक्टर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, डॉ. सुजित परदेशी, यांत्रिक अभियांत्रिकी, चेअरमन बी.ओ.एस. , डॉ. सुनील देशपांडे, प्राचार्य, मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्वे नगर, पुणे. श्री आकाश खरोटे, ‘इंडिया फर्स्ट रोबोटिक’ पुणे, डॉ. सुभाष गाढवे, सहाय्यक प्राध्यापक, डी. वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी पुणे, तसेच डॉ. रुपेश भोरटके, प्राचार्य, मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे या तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गणगे, कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, सचिव, किशोर मुंगळे व कार्यकारिणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रुपेश भोरटके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here