Shrigonda : ऑल इंडिया पँथर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमर घोडके यांची निवड

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – ऑल इंडिया पँथर सेनेचे (राष्ट्रीय अध्यक्ष) दीपक केदार व (महाराष्ट्र महासचिव) विनोद भोळे यांच्या आदेशाने (अहमदनगर जिल्हाअध्यक्ष) योगेश थोरात यांनी अमर दीपक घोडके यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्यात कार्यरत असणारे अमर घोडके यांचा चळवळीचा इतिहास अतिशय संघर्षवादी आहे. त्यांच्या मार्फत दलित, आदिवासी, कष्टकरी, शेतकरी,उपेक्षित समाजाच्या वेगवेगळ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये ते न्याय हक्कासाठी सक्रिय सहभागी असतात. तालुक्यात घडलेल्या दलित/आदिवासी अत्याचारांच्या अनेक घटनांमध्ये त्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अमर घोडके यांनी प्रशासनाकडे मोठा पाठपुरावा केल्याचेही सर्वश्रूत आहे.

लिंपणगाव जळीतकांड, ढवळगाव अत्याचार घटना, चिंबळा येथील तरुण मुलीच्या अन्यायाची घटना, भानगाव येथील आदिवासी समाजाच्या महिलेची नग्न धिंड, मागासवर्गीय महिलेचा अंत्यविधी थांबवून मृतदेहाची अवहेलना प्रकरण, भानगाव येथील आदिवासी मुलाच्या हत्येचा गंभीर विषय याचबरोबर तालुक्यातील विविध भागात होणाऱ्या अत्याचारांचा घटनांमध्ये आवाज उठवत प्रशासनास धारेवर धरून, पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत अमर घोडके यांनी आपली आजपर्यंतची कारकीर्द गाजवली आहे.

तालुक्यात कार्यरत असणाऱ्या या तरुण कार्यकर्त्याबरोबर मोठी तरूणांची फौज आहे. घोडकेंच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करीत, अभिनंदन केले जात आहे. तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला वठणीवर आणण्याचे काम घोडके यांनी अविरत पणे चालू ठेवले आहे. २६ जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे आंदोलन असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पद स्पर्ष झालेल्या ठिकाणी श्रीगोंदा नगरीतील बाबासाहेब आंबेडकरांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे स्मारक उभारण्यासाठी केलेले आंदोलन हे सर्व श्रीगोंदा वाशियांना ज्ञात आहे.
अशा प्रकारे एका तडफदार कार्यकर्त्याची एका झुंजार संघटनेशी नाते जोडणे ही एक लक्षवेधी घटना असल्याचे तालुक्यातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बोलत आहेत. पीडितांना न्याय देण्यासाठी अमर घोडके कटिबद्ध होते आणि संघटनेच्या माध्यमातून सक्रिय राहतील अशी ही अनेकांना आशा आहे. त्यांच्या निवडीबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पत्रकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यवसायिक क्षेत्रातील लोक शुभेच्छा देत आहेत.

याचबरोबर ऑल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचारा विरोधात लढा देत असल्याने सामान्य, दलित, पीडित, वंचित, शोषित, मुस्लिम, आदिवासी घटकांचा दबलेला आवाज आता गगनाला भिडण्यास सज्य होत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत कायदेशीर मार्गक्रमण करीत आहे. नमूद प्रवर्गातील लोकांना येणाऱ्या अडचणी व सामाजिक उपक्रमांसाठी अमर घोडके यांच्याशी मो.क्र. ९६५७६१२१९६ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here