जिल्ह्यात वीस जणांना बाधा, शहरात 13 रुग्ण
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर : आज 20 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामध्ये नगर शहर 13, कर्जत तालुक्यात दोन, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगारमधील एक अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर शहरात भराडगल्ली येथे सहा, तोफखाना चार, शास्त्रीनगर एक, सातभाई मळा एक आणि गंजबाजार येथे एक आणि गवळीवाडा, (भिंगार) एक येथे हे रुग्ण आढळून आला. राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे एक, रानेगाव (ता. शेवगाव) एक, जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला. कर्जत तालुक्यातील माहीजळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी एक आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एक रुग्ण आढळून आला. जिल्ह्यातील क्टिव रुग्ण संख्या 203 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 638 जणांना कोरोना झाला आहे. 418 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात आज 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात, नगर शहरातील दहा, संगमनेर चार, राहाता तीन आणि नगर ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.