आघाडीत बिघाडी नाही, आम्ही एकत्र – ना. थोरात

शिबलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या महसूलमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
आश्वी : आघाडीत बिघाडी नाही, आम्ही तिघे एकत्र आहोत. मात्र काही लोक आमच्यात बिघाडी व्हावी यांची वाट पाहत आहेत. असा सनसनीत टोला राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी पत्रकाराशी बोलताना विरोधकाना लगावला. तर कार्यक्रमादरम्यान उपस्थिताना मार्गदर्शन करताना करोना काळात स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे असून दंडकारण्य अभियान हे वृक्ष व पर्यावरण संवर्धनाची राज्यातील मोठी लोकचळवळ असल्याचे सागितले.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल सह्याद्री इटरनँशनल स्कूलच्या प्रागंणात आयोजित पंधराव्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कॉग्रेस नेते सुनिल धाबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवाजीराव थोरात, लक्ष्मणराव कुटे, बाबा ओहळ, मिराताई शेटे, सुनंदाताई जोर्वेकर, बाबासाहेब सौदागर, अजय फटागरे, अमित पंडीत, राहूल दिवे, गणपतराव सांगळे, दिलावर शेख, प्रमोद बोद्रें, राजेद्रं चकोर आदिसह तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले की, भयानक दुष्काळ, पावसाची कमतरता, आरोग्याच्या समस्या आहेत. हे सर्व ग्लोबल वार्मिंगचे परिणाम आहेत. यावर मात करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य हे अभियान खर्या अर्थाने आता लोकचळवळ ठरले आहे. सहकारमहर्षीनी 2006 मध्ये वाजत गाजत डोंगरावर जाऊन वृक्षारोपणाचे अभियान सुरू केले. या लोकचळवळीने 14 वर्षामध्ये डोंगर दर्यांमध्ये अनेक वृक्षरोपण केल्याने आपला तालुका हिरवा दिसू लागला आहे. दंडकारण्य अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नोंद घेतली गेली आहे. सध्या प्रदूषणा बरोबर करोनाचे मानवावर संकट आले आहे, अशा संकटांचा मुकाबला आपल्याला करावा लागेल. करोना काळामध्ये कोणीही बिनधास्त वावरु नका, तो कुणालाही होऊ शकतो. प्रत्येकानी खबरदारी घ्या असे सांगताना शिबलापूर येथील नागरिकांनी कायम आपल्यावर प्रेम केले आहे, सह्याद्री संस्थेने सुरू केलेले हे शैक्षणिक संकुल मोठे गुणवत्तेचे होणार असून यामध्ये नागरिकांचा कायम पाठिंबा राहील. यापुढील काळातही प्रत्येक सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी काम करताना अधिकाधिक वृक्षारोपण व संवर्धन करावे असे आवाहनही त्यांनी केले
दरम्यान यावेळी पत्रकाराशी बोलताना महसूलमंत्री म्हणाले की, जगाबरोबरचं महाराष्ट्रही करोना प्रादुर्भावामुळे अर्थिक अडचणीचा सामना करत आहे. परंतू आघाडी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. पारनेर येथिल सहा नगरसेवकानी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकरानी विचारला असता आमची आघाडी भक्कम असून आम्ही एकत्र काम करत आहोत, मात्र काही लोक बिघाडीची वाट पाहत असतात असा सनसनीत टोला विरोधकाना लगावला. यावेळी शेतकर्‍याना कर्जमाफीचा दुसरा हप्ता देण्याची तजवीज सरकारकडून सुरु असल्याचे सांगितले. सध्या राज्य आर्थिक आडचणीत असताना गाड्या खरेदीचा प्रश्न राज्यात गाजत असल्याबद्दल ना. थोरात यांना विचारले असता प्रशासन चालवत असताना गाड्यांची गरज भासत असते. शिक्षण खात्याने सहा गाड्या खरेदीचा प्रस्ताव दिला होता. मात्र एका गाडीला मंजुरी मिळाली आहे. मात्र प्रसारमाध्यमांनी पुर्ण माहिती न घेता शासनाने सहा गाड्या खरेदी केल्याची बातमी दाखवली असे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here