पोलीस उपअधिक्षक जवळेंचं लोकाभिमुख काम

राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने गौरव

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्र

नेवासे : जनसामान्यांसाठी पोलीस सेवेतील शेवगाव उपविभागीय पोलीस उपअधिक्षक मंदार जवळे यांचं काम लोकाभिमुख असून त्यांनी नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील सेवेबद्दल गृह मंत्रालय भारत सरकारकडून आंतरिक सेवा सुरक्षा पदक मिळाल्याबद्दल तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या उल्लेखनीय कामामुळे नुकताच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण पटारे, यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस प्रशासनात मोठ्या पदावर काम करत आसताना शक्यतो कामाच्या व्यापामुळे सर्वसामान्य व्यक्तिंना न्याय देण्यासाठी विलंब होत असतो; परंतु पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांची कामाची पध्दत वेगळी असून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम, त्यांच्या अडचणी समजावून घेवून कायद्याच्या चौकटीत राहून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी तप्तरता असते. जिल्ह्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र म्हणून शेवगाव उपविभागीय कार्यालय आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात शेवगावसह पाथर्डी, सोनई, नेवासे, शनिशिंगणापूर हे पाच पोलीस ठाणे येत आहे. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्यानंतर त्यांच्यासारखे लोकाभिमुख कर्तव्यदक्ष अधिकारी मंदार जवळे असल्याने सर्वसामान्य जनता समाधान व्यक्त करत असते. यावेळी नेवासे प्रेस क्लब अध्यक्ष सुहास पठाडे, पत्रकार सोपान भगत, नानासाहेब पटारे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, पत्रकार, महसूल, आरोग्य, प्रशासन करत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल कर्तव्य पार पाडणार्‍या महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात येत असल्याचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे यांनी सांगितले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here