Sangamner: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन… शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह

0

संगमनेरात एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 12

राष्ट्र सह्याद्री। संगमनेर:
: राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथील शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ना. थोरतांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे, ना. थोरात यांच्यासह 20 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, महसूलमंत्री थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज संगमनेरकरांना आणखीन एक जोरदार धक्का बसला. संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौकातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोना मुळे मृत्यू झाला.

तालुक्यातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here