Ahmednagar : CoronaUpdates : जिल्ह्यात आज आणखी वाढले १६ कोरोना बाधित

2
प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री १६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ११ तर पेमरेवाडी येथील ०१, अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ०२ पारनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील ०१ आणि राहाता तालुक्यातील दाढ बु. येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. 

दरम्यान, आज सकाळी पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील चौघे, असे पाचजण बाधित आढळून आले होते. त्यामुळे आजच्या दिवसात बाधित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या २१ इतकी झाली आहे. आज सकाळी एकूण ३६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले.
जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या:  १९८
बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४५५
मृत्यू: १८
एकूण नोंद रुग्ण संख्या: ६७१
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here