Newasa : भेंडा येथे पिकअप चालकाला दोन लाखाला लुटले!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावून दोन लाख रुपयांची लूट केल्याची फिर्याद चालक हरिदया सोपान आहेर (रा.रामज पिंपळस,ता.निफाड) याने नेवासा पोलिस ठाण्यात दिली आहे.

शेवगांव विभागीय पोलिस उपधीक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक (एम.एच १५ पी.व्ही २६८०) या वाहनाचा चालक लातूरहून नाशिककडे जात होता.
नेवासा तालुक्यातील भेंडा ब्रूद्रुक येथील माऊली दूध संकलन केंद्राजवळ नेवासा – शेवगाव मुख्य रस्त्यावर मंगळवारी (दि.७ रोजी) दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास पिकअपला अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावली. पिकअप थांबवून चालकाकडील रोख दोन लाख रुपये व ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊन पलायन केले. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. खरोखरच लूट झाली की लुटीचा बनाव निर्माण केला. याचाही तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here