Newasa : ११५ किलो चंदनासह स्विफ्ट कार जप्त!

साडेसात लाखांचा ऐवज हस्तगत!
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नेवासा तालुक्यातील झापवाडी शिवारात चंदन तस्कराकडून ११५ किलो चंदनासह स्विफ्ट कार असा साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करत सोनई पोलिसांनी आण्णा लक्ष्मण गायकवाड (रा.घोडेगाव ता.नेवासा) यास अटक केली आहे.
पोलीस नाईक किरण गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आण्णा लक्ष्मण गायकवाड (रा.घोडेगाव ता.नेवासा) याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यास न्यायालयात हजर केले असता १० जुलै पर्यंत पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी आहे की सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना गुप्त बातमीदाराकडून झापवाडी शिवारातील एम आई डी सी परिसरात एक व्यक्ती एका कारमध्ये सुगंधी लाकडे(चंदन)भरीत असल्याची माहिती मिळाली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक जनार्धन सोनवणे यांचा सापळा पथकातील सहायक पोलिस निरीक्षक थोरात, हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गावडे,पोलीस नाईक शिवाजी माने,पोलीस कर्मचारी विठ्ठल थोरात,पोलीस नाईक किरण गायकवाड,पोलीस कर्मचारी संजय चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल बाबा वाघमोडे,पोलीस कॉन्स्टेबल मोरे हे एम आई डी सी परिसरात गेले असता त्यावेळी सदर इसम हा स्वीप्ट कार(क्र.एम एच १६ बी एच. ३७८९)मध्ये चंदन भरत असताना मिळून आला. त्यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव आण्णा लक्ष्मण गायकवाड (वय ३६ रा.घोडेगाव.ता.नेवासा) असे सांगितले.
त्यास ताब्यात घेऊन सदर चंदन कोठून आणले,कुठे घेऊन चालला आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने समर्पक उत्तर दिले नसल्याने सदर व्यक्ती बेकायदेशीरपणे चंदन बाळगत असून चोरट्या पद्धतीने त्याची वाहतूक करत असून अवैध रित्या विक्रीकरण्याच्या उद्देशाने चंदन गाडीमध्ये भरत असून सुमारे २ लाख ५३ हजार रुपये कितमीचे ११५ किलो चंदन त्याच्याकडे मिळून आले असून स्वीप्ट कार सह ७ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल सोनई पोलिसांनी जप्त केला आहे. आण्णा लक्ष्मण गायकवाड यास अटक करून न्यायालयात हजर केले असता १० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहायक पोलिस निरीक्षक जनार्धन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here