Kada : धानोरा परिसरात टँकर-टेम्पोचा समोरासमोर अपघात

0
टेम्पोचालक जागीच ठार तर टँकरचालक जखमी
टाटा कंपनीचा टेम्पो व टँकरचा नगर-बीड रोडवर धानो-याजवळील कठीण वळणावर समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालक हा जागीच ठार झाला. तर टँकरचालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी कडा येथील (एम.एच.-२३/ए.यु./२६७०) असा क्रमांक असलेला टाटा कंपनीचा टेम्पो (छोटा हत्ती) हा कड्यावरुन वैरणीचे भाडे घेऊन धानो-याकडे चालला होता. तर नगरकडून कड्याकडे येणारा इंधनाचा टँकर (एम.एच.-१६/क्युँ./५९००) या दोन्ही वाहनाची नगर-बीड हाय-वे रोडवरील धानो-याजवळील कठिण वळणावर दुपारी दीड-वाजेच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक झाली.
या भीषण अपघातात टेम्पोचालक अनीस जमाल शेख, (रा.कडा.) हे जागीच ठार झाले. तर टँकर चालक विठ्ठल लक्ष्मण रेडेकर (रा.आष्टी) यांच्या डोक्याला व हाताला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले आहेत. जखमी टँकरचालकाला तातडीने उपचारार्थ नगरला हलविण्यात आले असून मयतावर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. या अपघाताचे कारण मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही. अपघातस्थळी अंभोरा पोलिसांनी तात्काळ भेट देऊन वाहतुकीची कोंडी मोकळी करुन जखमींना मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here