‘राजगृह’ हल्ला : हल्लेखोर समाजकंटकांवर कठोर कारवाई करा

3
नेवासा काँग्रेसची मागणी, तर श्रीगोंद्यातही विविध दलित संघटना,दलित पँथर,संभाजी ब्रिगेड,बहुजन समाजवादी पार्टीकडून निषेध 
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या ऐतिहासिक वास्तूची विटंबना करणाऱ्या समाजकटकांचा त्वरीत शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी नेवासा तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात नेवासा तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राहिलेली ‘राजगृह’ ही वास्तू देशाचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा असून भारतीय जनतेचे हे प्रेरणास्थान आहे. भारतीय जनतेच्या श्रद्धेला ठेस पोहचविण्यासाठी काही संकुचित वृत्तीच्या लोकांनी या वास्तूची तोडफोड करून विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे समस्त भारतीय जनतेमध्ये असंतोष धगधगत असून या घटनेमागील अपप्रवृत्तीना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास दिरंगाई झाल्यास संपूर्ण देशात याचा तीव्र उद्रेक होण्याचा धोक्याकडे याद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनावर नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, उपाध्यक्ष सुनील भोगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे, सचिन बोर्डे, नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव, एस.सी.विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, जाकीर शेख, नितीन मिरपगार यांच्या सह्या आहेत. नायब तहसीलदार परदेशी यांनी निवेदन स्वीकारले.
“राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करा” – श्रीगोंद्यात विविध संघटनांकडून निषेध
राजगृहात करण्यात आलेल्या तोडफोडीनंतर विविध दलित संघटना, दलित पँथर, संभाजी ब्रिगेड,बहुजन समाजवादी पार्टी आदी संघटनांनी तहसीलदार याना निवेदन देऊन आरोपी लवकरात लवकर अटक करून त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री याना पोस्टाने पाठवले आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here