Newasa : सोनईमध्ये पुन्हा लॉकडाऊन; लोखंडी कठडे लावून रस्ते बंद

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – एका रुग्णाचा काल कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाल्यामुळे सोनई परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्या मयत रुग्णाची कोरोना चाचणी झालीच नाही, पण रुग्णाची लक्षणे कोरोनासारखीच असल्यामुळे दक्षता म्हणून प्रशासनाने सोनई गाव अनिश्चित काळासाठी पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद केले आहे. 

गावातील न्हावी गल्ली शिवाजी चौक माळी गल्ली टकारगल्ली शिवाजी रोड शेटे गल्ली नवी पेठ स्वामी विवेकानंद चौक व गावातील मुख्य बाजार पेठ महाविरमार्ग हा भाग लोखंडी कठडे लावून पूर्णपणे बंद करण्यात आला असून नागरिकांनी घरा बाहेर येऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मयत रुग्णाची कोरोना चाचणी का करण्यात आली नाही, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे न समजल्यामुळे गावात संभ्रम असून दबक्या आवाजात एकमेकांशी चर्चा करत आहेत. तर रुग्ण मरण पावल्यानंतर कोरोना चाचणी करु शकत नाही. त्यामुळे सदर रुग्ण कोरोनामुळेच झाला असे सांगता येणार नाही, असे आरोग्य अधिकारी डॉ. कसबे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली.

मयत कुटुंबातील ईतर सदस्य त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या तपासण्या सुरु असून त्याची माहिती एक दोन दिवसांत मिळणार असून त्या तपासणी नंतरच आपल्याला पुढील कारवाई करता येईल, असे डॉ. कसबे यांनी सांगितले. पण कालच्या घटनेची सोनईकरांनी धास्ती घेतली असून गावात सर्वच रस्त्यावर शुकशुकाट असून कुणीही बाहेर येण्यास तयार नाही. पण नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन प्रशासनाने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here