Sangamner : कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू; एकूण मृत्यू संख्या 13 तर आज नवीन 12 जण बाधित

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरकरांना दररोज धक्क्यावर धक्के देण्याचे काम कोरोना विषाणू करत आहेत. त्यात आज शहरातील श्रमिक नगर येथील एका कोरोना बधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुळे 13 जणांचे मृत्यू झाले असून एकूण कोरोना बधितांची संख्या 169 वर पोहचली आहे.त्यामुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

आज तालुक्‍यातील कुराण या गावात 11 जण तर पेमरेवाडी, निमगाव जाळी व शहरा जवळील ढोलेवादी येथे एक जण तर शहरातील पंजाबी कॉलनीत दोन, ऑरेंज कॉर्नर दोन व गणेशनगर एक असे एकूण 19 जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे त्यामुळे संगमनेरच्या नागरिकांच्या काळजीत अधिक भर पडली आहे

शहरात चारच दिवसांपूर्वी श्रमिकनगर मध्ये  पहिला 57 वर्षीय व्यक्ती समोर आली होता. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज सकाळीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगमनेरातील कोरोना बळींची संख्या तेरा वर पोहचली आहे

शहरातील सय्यदबाबा चौकातील एक 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा काल मृत्यू झाला होता हा शहरातील बारावा बळी होता तर आज श्रमिक नगर येथील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेरकरांना जोरदार धक्क्ये बसत आहे.
हा धक्का सहन करीत असतांनाच कल रात्री  कुरणमधील 38,46,19,42,25 व 25 वर्षच्या पुरुष तर 8,15, 8 व 19 वर्षच्या चार मुली तर 40 वर्षीय महिला असे अकरा रुग्णांसह पेमरेवाडी 50 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी 52 वर्षीय महिला तर संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी परिसरातील एक 60 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेरात खळबळ उडाली होती.

तर आज दुपार नंतर शहरातील ऑरेंज कॉर्नर येथे 59 वर्षीय व 73 वर्षीय महिला, असे दोन व गणेश नगर मध्ये 65 वर्षीय एक पुरुष तर तालुक्यातील निमगाव जाळी येथे प्रथमच 28 वर्षीय एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण संख्याही 169 च्या घरात गेली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे संगमनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here