Shrigonda : सहकार महर्षी काष्टी संस्थेच्या अध्यक्ष सचिवांसह तिघांवर फिर्याद दाखल

खोट्या व बोगस सह्या करुण १ कोटी ८० लाखाचा जमिनीवर बोजा नोंदविला ?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेल्या सहकार महर्षी काष्टी सोसायटीच्या कारभाराबद्दल नागवडे कारखाना संचालक राकेश पाचपुते, प्रा.सुनील माने, सह इतर सभासदांनी नुकतेच गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले असतानाच संस्थेचे माजी व्यवस्थापक जालिंदर माणिकराव पाचपुते यांनी संस्थेकडून २०१८ मध्ये आपल्या कुटुंबातील कोणत्याच खातेदाराने सोसायटीकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसताना सुद्धा संस्थेचे अध्यक्ष विठोबा पाचपुते, सचिव एस.बी.बुलाखे यांनी माझ्या कुटुंबातील सदस्याच्या खोट्या व बोगस सह्या इकरारपत्रावर करुन त्याच्या आधारे १ कोटी ८० लाखाच्या बोजाची नोंद त्याच्या शेतीच्या क्षेत्रावर केल्याने संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्यासह पाचजणां विरूद्ध जालिंदर पाचपुते यांनी श्रीगोंदा पोलिस  ठाण्यात फिर्याद दाखल करुन याची कसून चौकशी करुन दोषी विरूद्ध भारतीय दंड विधानाप्रमाणे कडक कार्यवाहीची मागणी केल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील भगवानराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आशिया खंडात सर्वात मोठी व सव्वा दोनशे कोटीची वार्षिक उलाढाल असलेल्या सहकार महर्षी काष्टी संस्थेत माजी व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी अध्यक्ष विठोबा पाचपुते, सचिव एस.बी.बुलाखे, यांच्यासह सतिष रमेश पाचपुते, गणेश मच्छिद्र पाचपुते, व ज्ञानेश्वर बाळासाहेब इंगवले यांना खोट्या व बोगस कागदपत्रासाठी सह्या केल्याप्रकरणी आरोप केले आहे.

व्यवस्थापक जालिंदर पाचपुते ६० लाख रुपये, त्याचे भाऊ मच्छिद्र पाचपुते ६० लाख रुपये,  श्रद्धा जालिंदर पाचपुते व मिरा मच्छिंद्र पाचपुते यांचे नावे प्रत्येकी ३० लाख रुपये, असा एकूण १ कोटी ८० लाखाचा बोजा शेतीच्या सातबारा उताऱ्यावर खोट्या सह्या करुण गावातील कामगार तलाठी यांना हाताशी धरुण नोंदविला आहे. याप्रकरणी कामगार तलाठी सुपेकर यांनी नियमाप्रमाणे नोटीस देणे बंधनकारक असताना त्यांनी राजकीय दबावापोटी त्या दिल्या नाहीत. याची वरिष्ठांमार्फत स्वतंत्र  चौकशी करणार आहे.

संस्थेचे मुख्य मार्गदर्शक भगवानराव पाचपुते यांच्या मुलांच्या गैरकारभाराबाबत जालिंदर पाचपुते यांनी २७/४/२०२० रोजी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जी तक्रार नोंदविली होती. त्याचा सूड घेण्यासाठी भगवानराव यांनी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, यांच्यासह कामगारांना हाताशी धरुण हे कटकारस्थान त्याच्या इशाऱ्यावरुन झालेले आहे, असे जालिंदर पाचपुते यांनी दि.५ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here