shrigonda : मित्राचा विरह सहन न झाल्याने बंद कबर खोदली

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी गावातील पोस्टमन मिरसाब कादरभाई इनामदार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर तपास चालू असताना गावातील दोन मद्यपी इसमाने गावातच गावठी दारू पिऊन झिंगाट झाल्यावर त्यांना त्याच्या मयत मित्र मिरसाब याची आठवण आणि दारूच्या नशेत त्यांना आपला मित्र पहावा वाटला आणि मग त्या दोघांनी एक लोखंडी पहार आणि एक फावडे उपलब्ध केले आणि गावातील वेशीच्या बाहेर मारूती मंदिराच्या पाठीमागे मुस्लीम कबरस्थान या ठिकाणी पोहचले आणि दारूच्या नशेत त्यांनी त्यांचा मयत मित्र मिरसाब याची कबर शोधली आणि पायाच्या बाजूने कबर उकरायला सुरुवात केली.

हे दोन बहाद्दर मयत मिरसाब याची कबर खोदण्यासाठी कबरस्थानमध्ये गेले असल्याची खबर वाऱ्यासारखी गावात पोहोचले आणि गावातील काही सज्ञान नागरिक मुस्लिम कबरस्थानमध्ये पोहचले आणि त्यांना कबर खोदण्यापासून विरोध करू लागले. त्यावेळी मद्यधुंद त्या लोकांनी नागरिकांना सांगितले आमचा मित्र आहे आणि आम्हाला त्यास पहायचे आहे. परंतू जास्त लोक जमा झाले आणि मद्यपी दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र ही खबर वाऱ्यासारखी गावात पसरली आणि याबाबत चर्चेला उधाण आले होते.

पायाच्या बाजूने थोडी कबर उकरलीआहे – इनामदार
याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी मयत मिरसाब यांचे बंधू मुन्ना इनामदार यांच्याशी मोबाईल फोन करून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आताच कबर पाहून आलो आहे. कबर पायाच्या बाजूने खोदली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here