Akole : विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सास-यांवर गुन्हा दाखल

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

विवाहितेस सासरी नांदत असताना घर काम होत नाही. तू इथे राहू नको तसेच घरखर्चासाठी तुझ्या आई वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे बोलून फिर्यादीस वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी मारहाण करून शारीरिक मानसिक छळ केला. याप्रकरणी पती प्रवीण निवृत्ती हासे, सासरा निवृत्ती नाथा हासे सासु लता निवृत्ती हासे (रा.चिखली ता.संगमनेर) विरूद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 
याबाबत विवाहिता नंदा प्रवीण हासे हिने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की, 26 जानेवारी 2015 ला फिर्यादीचे प्रवीण निवृत्ती हासे याचे बरोबर लग्ण झाले आहे. नंतर चिखली येथे नांदत असताना व चाकण जिल्हा पुणे येथे दोन वर्षानंतर ते ऑगस्ट 2018  नांदत असताना पती प्रवीण हासे, सासरा निवृत्ती नाथा हासे व सासू लता निवृत्ती हासे यांनी तिच्याशी जर झाल्याने तिला काम होत नसल्याने, तुझे घर काम होत नाही, तू इथे राहू नको तसेच घरखर्चासाठी पैसे न देता तुझ्या आई-वडिलांना खर्च करण्यासाठी पैसे घेऊन ये, असे बोलून फिर्यादीस वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली.
फिर्यादीला मुलगा झाल्यानंतर पती- प्रवीण निवृत्ती हासे याने पत्नीचे हक्कापासून वंचित ठेवून फिर्यादीचा शारीरिक मानसिक छळ केला. फिर्यादीवरुन अकोले पोलिस ठाण्यात पती,सासरा, सासु यांच्याविरुद्ध गु.र.न- २२१/२०२० भा.द.वी कलम ४९८ ए,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here