Shrirampur : शहरातील वॉर्ड नं. 2 कंन्टेन्मेंट झोन घोषित; काल तीन जणानंतर आज सकाळी आणखी दोन पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या 37 वर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – शहरातील वॉर्ड नंबर 2 मध्ये बुधवारी सायंकाळी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी त्यात आणखी दोघांची भर पडली. आज सकाळी याच वॉर्डमधील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. वॉर्ड नंबर 2 कन्टेनमेंट झोन घोषित घोषित केला आहे.

बाधितांची संख्या आता 37 वर पोहोचली आहे. तालुक्यामध्ये आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तेथील बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असल्याने श्रीरामपूरकरांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, आज व्यापारी असोसिएशनने स्वयंस्फूर्तीने 4 दिवस बंद पाळावा, असे आवाहन केले आहे; मात्र काही व्यापारी त्यास विरोध करत असल्याने सामान्य व्यापारी बंदबाबत संभ्रमावस्थेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here