Shrigonda : शहरात एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येळपणे या ठिकाणी कोरोनाचे थैमान चालू असताना आज पुन्हा श्रीगोंदा शहरात एक वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे, कोळगाव या ठिकाणी कोरोनाचे थैमान चालू आहे. प्रतिबंध म्हणून त्या गावातील परिसर सील करण्यात आला आहे. त्यात भर म्हणून आज श्रीगोंदा शहरातील वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या एका डॉक्टरला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांचा घशाचा श्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.
आज त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते सोलापूर जिल्ह्यात जाऊन आल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची पडताळणी चालू असून जे लोक डॉक्टरच्या संपर्कात आले आहेत. त्याच्या सर्वांचे घशाचे श्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here