Corner Stone Article : वाहन चालवताना ही काळजी घ्या…

ऍड. शिवानी संभाजी झाडे. (B.S.L.LL.B.LL.M.)
सध्याच्या धावत्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्या सर्व घटनानांना माणसाला सामोरे जावे लागते. त्यापैकी काही म्हणजे रस्ते अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन इत्यादी. रस्ते अपघातांमध्ये भारताचा खूपवरचा क्रमांक आहे. अपघात हे काही वेळा आपल्या स्वतःच्या चुकांमुळे पण होतात. यामध्ये प्राणहानी पण मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. आपण जर बारकाईने लक्षात घेतले तर रस्ते अपघातांचे वेगवेगळी करणे असतात त्यामध्ये वेगाने वाहन चालवणे, सीट बेल्ट, हेल्मेट यांचा वापर न करणे अशा वेगवेगळ्या कारणांचा त्यामध्ये समावेश आहे.
वाहन चालवताना आपण योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन चालवताना आपण वाहतूक नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. देशात मोटार वाहन कायदा १ सप्टेंबर१९८८ रोजी लागू करण्यात आला. या कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाते. घाई गर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी स्वतःहून वाहनांची आणि रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालविण्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. वाहन चालवताना चालकाने खालील काही सूचनांचे पालन करावे.

आपल्या मागच्या व पुढच्या वाहनात योग्य ते अंतर ठेवावे
मोठी वाहने जसे बस,ट्रक यांच्या मागे अतिशय जवळ गाडी चालू नका.
गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका. आपल्या पुढे चालणाऱ्या वाहनाच्या ब्रेक लाईट वर नेहमी लक्ष ठेवा. वाहनसमोरील काच नेहमी स्वच्छ ठेवा. जास्त चिखल,ऑइल असलेल्या रस्त्यावरून जाणे टाळावे वाहन घसरण्याची भीती असते. सर्वात महत्वाचे वाहन कमी वेगाने चालवावे व हेल्मेट,सीट बेल्ट यांचा वापर करावा.
मोटार वाहन कायद्यानुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यावर मोटार वाहन चालवताना काय नियम असावेत हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. वाहन चालवताना वाहतुकीच्या खुणा माहिती असणे गरजेचे आहे. विशिष्ट संकेत चिन्हांनी वेगवेगळे संदेश देण्याकरिता सुबाह्य आधारावर बसविलेले साधन असते यामध्ये थांबा, वेगमर्यादा, वेगरोधक, वळण,वाहनमार्ग, प्रवेशबंद यासारख्या चिन्हांचा समावेश असतो.
मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारनांमुळे नियम कडक झाले असले तरी त्यासोबत वाहन चालकांसाठी या कायद्यात काही समाधानकारक तरतूदीही करण्यात आल्या आहे. वाहन परवान्यासाठी अर्ज आणि वाहन नोंदणी आता राज्यातील कोणत्याही आरटीओमध्ये करता येते. तसेच नवीन वाहन परवान्यांचे नूतनीकरण वर्षभरात कधीही करू शकता. याआधी एक महिन्याच्या आत नूतनीकरण करणे आवश्यक होते. या कायद्यातील सुधरनेनुसार नव्या शिक्षा लागू केल्या आहे. मोटर वाहन कायद्यातील नव्या तरतुदींमुळे वाहन नियम तोडल्यास होणाऱ्या शिक्षा आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

अशाप्रकारे वाहन चालवताना आपण योग्य ते कायदे,नियम सांकेतिक खुणा या सर्वांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहन चालकाने ही खबरदारी घ्यायलाच हवी अस मला वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here