श्रीरामपूर बसस्थानक कचर्‍याच्या विळख्यात

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर : गाडी क्रमांक एम एच 20 पी एस 1232 फलाट क्र मांक 2 दोन उभी आहे फू …. हा आवज ऐकला की आपल्याला आठवण येते ती बस स्टँडची; पण मात्र आता हाच आवज गेल्या तीन चार महिन्यांपासून बंद आहे ना बस आहे ना बसस्थानकात प्रवाशांची गर्दी याच कारण एकच असे ते म्हणजे कोरोना जगात कोरोनाने शिरकाव केला आणि सर्व ठप्प झाले.
कोरोनाचा ‘लाल परी’ला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे साध्या बर्‍याच शहरातील बस स्थानके ही ओस पडली असून ना त्या ठिकाणी कोणी कर्मच्यारी आहे ना कोणी सुरक्षा रक्षक. आज तीच ‘लालापरी एकांत उभी आहे. गेल्या तीन चार महिन्यापासूपन ‘लालपरी’कडे ना कोणाचे लक्ष गेले ना कोणाला तीची आठवण आली. ज्या बस स्थानकात ‘लालपरी’ची वर्दळ आसायची आज ती लालपरी गेल्या तीन महिन्यापासून एकाच ठिकाणी उभी आहे. लोक तिची अतूरतेने वाट पहायचे; मात्र आज त्याच ‘लालपरी’ डोळयाच्या आड गेली आहे. बंदच्या काळात तिच्याकडे कोणाला पाहण्यासाठी वेळ नाही. तर ज्या बस स्थानकात या लालपर्‍या उभ्या आहेत. त्या बसस्थानकांमध्ये कचर्‍याने आपले वास्तव्य सुरू केले आहे. बसस्थानकात कचरा डेपो झाली की, काय? असा प्रश्न निर्माण होते. सध्या श्रीरामपूर बस स्थानकाचीही अशीच अवस्था झाली असून या ठिकणी मोठ्या प्रमाणात घाणीचे सम्राज झाल्याचे दिसून आहे. तर बसस्थानकाच्या भिंती गुटखा खाणार्‍यांनी लाल केल्या आहेत. ज्याप्रमाणे रोज शहर स्वच्छ केले जाते त्या शहरातील बसस्थानक स्वच्छ करण्यास कोणाकडे वेळी नाही का? असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here