रस्त्याच्या वादातून एकास जबर मारहाण

बाजार समितीच्या संचालकासह चौघांवर गुन्हा

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
राहुरी : तू आमच्या घरासमोरील रस्त्याने का जातो. तू आमच्या घरासमोरील रस्त्याने जायचे नाही. असे म्हणून चार जणांनी मिळून पाटीलबा बाचकर यांना कु-हाड, लाकडी दांडे व लाथा बूक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक 8 जुलै रोजी घडली आहे. या बाबत राहुरी पोलिसांत राहुरी बाजार समितीच्या संचालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने बाबत पाटीलबा रंगनाथ बाचकर यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पाटीलबा रंगनाथ बाचकर, वय 55 वर्षे, राहणार गोटुंबे आखाडा तालूका राहुरी. हे राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे पत्नी मिराबाई पाटीलबा बाचकर, मुलगा कुंदन पाटीलबा बाचकर असे कुटुंबासह एकत्रीत राहतात. पाटीलबा बाचकर हे सध्या पाटबंधारे विभाग राहुरी येथे नोकरीस आहे. तसेच त्यांच्या घराचे शेजारी आण्णासाहेब रंगनाथ बाचकर हा त्याचे कुटुंबासह एकत्रीत राहत आहे. पाटीलबा बाचकर आणि अण्णासाहेब बाचकर या दोघांमध्ये रस्त्याचे जाणे येण्यावरुन वाद आहेत. दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पाटीलबा बाचकर हे अण्णासाहेब बाचकर याचे घरा समोरील रस्त्यावरुन कामावर जात असतांना तेंव्हा आण्णासाहेब रंगनाथ बाचकर हा हातात लोखंडी कु-हाड घेवुन, अमोल आण्णासाहेब बाचकर हा हातात लाकडी दांडा घेवुन तसेच तेजस आण्णासाहेब बाचकर व अनिता आण्णासाहेब बाचकर हे तिथे आले व पाटीलबा बाचकर यांना शिवीगाळ करुन आण्णासाहेब बाचकर हा म्हणाला की, तु आमचे घरा समोरील रस्त्याने का जातो? तु घरा समोरील रस्त्याने जायचे नाही. तेंव्हा पाटीलबा बाचकर त्यास म्हणाले की, सदरचा रस्ता हा सार्वजनिक आहे. त्यामुळे मी रस्त्याने जातो. असे म्हणाले असता आण्णासाहेब बाचकर याने त्याचे हातातील कु-हाडीचा दांडा पाटीलबा बाचकर यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच अमोल बाचकर याने डोक्यात लाकडी दांडा मारला. तेजस बाचकर व अनिता बाचकर यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करु लागले तेव्हा पाटीलबा बाचकर यांच्या ओरडण्याचा आवाज एकुण त्यांचा मुलगा कुंदन पाटीलबा बाचकर, पत्नी मिराबाई पाटीलबा बाचकर असे सोडवा सोडव करण्यासाठी आले असता आण्णासाहेब बाचकर याने त्याचे हातातील कु-हाडीचा तुंबा मुलगा कुंदन याचे डोक्यात मारुन जखमी केले. तसेच अमोल बाचकर याने त्याची हातातील लाकडी दांडा मुलगा कुंदन याचे डोक्यात, पाठीत मारुन त्यास जखमी केले. वरील सर्वांनी पाटीलबा बाचकर व त्यांची पत्नी मिराबाई, मुलगा कुंदन यांना खाली पाडुन लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही जर या रस्त्याने परत गेले तर तुमचा मुडदा पाडु अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेबाबत पाटीलबा रंगनाथ बाचकर यांनी स्वतः राहुरी पोलिसांत हजर राहून फिर्याद दिली आहे. त्यानूसार आण्णासाहेब रंगनाथ बाचकर, अमोल आण्णासाहेब बाचकर, तेजस आण्णासाहेब बाचकर, अनिता आण्णासाहेब बाचकर सर्व राहणार गोटुंबे आखाडा, तालूका राहुरी. या चार जणां विरोधात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित राठोड हे करित आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here