वडाळा महादेव परिसरातील अशोकनगर फाटा हॉटस्पॉट

नागरिकांनी सहकार्य करावे ः तहसीलदार प्रशांत पाटील

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
वडाळा महादेव : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील अशोकनगर फाटा परिसरात दि. 17 पर्यंत सदरचे शेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे तरी सदर क्षेत्रापासून 200 मीटर पर्यंतचा परिसर हा कोरोना एरिया म्हणून घोषित करून सदरच्या क्षेत्रांमधून मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सदरच्या क्षेत्रांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असुन प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांना वाहनाचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करण्यात आले आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.
तालुक्यातील वडाळा महादेव येथील अशोक नगर फाटा परिसरातील तरुण दि 4 रोजी करोणा बाधित आढळल्याने परिसरात प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग प्रतिबंध अधिनियम 1887 महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील अधिसूचना करोणा 2020 अशा नियमान्वये राज्य शासन आदेशाप्रमाणे करोणा विषाणूचा कोव्हीड19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या मिशन बिगीन अगेन संदर्भात पोलीस प्रशासन आरोग्य विभाग यांचेकडून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दिनांक 17 -7 – 2020 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र असून यांचेवर वडाळा महादेव येथील ग्रामपंचायत प्रशासन नियंत्रण ठेवणार असल्याने परिसरातील नागरिकांनी शासकीय नियमाचे पालन करावे तसेच शासकीय नियमांचे पालन न करणार्‍या नागरिकावर कारवाई करण्यात येईल अशी सूचना प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे तरी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग पोलीस प्रशासन यांना सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here