श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींवर लवकरच ‘प्रशासक राज’

बेलापूर बुद्रुक, मातुलठान, खानापूर, एकलहेरे, लाडगाव यांचा समावेश

                                                                                          कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुदत संपून निवडणुका घेता न येणार्‍या श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 27 ग्रामपंचायतींवर लवकरच प्रशासक राज येण्याची चिन्हे आहेत. पुढील ऑगस्ट महिन्यात मुदत संपणार्‍या 15 आणि सप्टेंबर महिन्यात 12 ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. तालुक्यात या सर्व ग्रामपंचायती राजकारणात अत्यंत महत्वाच्या भूमिका बजावतात.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकार्‍यांची नेमणूक करण्याची कार्यवाही शासनाने इतर जिल्ह्यात हाती घेतली आहे. मात्र याबाबत येथे अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर अखेर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपत असून ऑगस्ट महिन्यात मुदत संपत असलेल्या मुठेवाडगाव,खानापुर, खोकर, वडाळा महादेव, मातापूर, महांकाळवाडगाव,नायगाव,टाकळीभान, भेरडापुर, वळदगाव, मालूनजा बुद्रुक, गळनिंब, बेलापुर बुद्रुक, बेलापुर खुर्द, पढेगाव या मोठ मोट्या समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सप्टेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या मातुलठान, घुमनदेव, गोंडेगाव, कारेगाव, निपाणीवडगाव, सराला, गोवर्धनपुर, एकलहेरे, लाडगाव, कुरणपुर, ब्राह्मणगाव वेताळ आणि मांडवे अशा 12 महत्वाच्या ग्रामपंचयतीनचा समावेश आहे.
पंचायत समितीमधील एका विस्तार अधिकार्‍यांकडे प्रत्येकी 3 ग्रामपंचायती याप्रमाणे प्रशासक म्हणून काही जिल्ह्यात जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ती येथेही राबविण्यात येईल.
दरम्यान, येत्या दोन महिन्यात मुदत संपणार्‍या या सर्व ग्रामपंचयाती अतिशय मोठ्या असून लोकसभा आणि विधानसभा निवडनुकानंतर त्या होत आहेत. या निवडणूका बहुदा पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्याचा सर्वांनाच अनुभव आहे.
केंद्रात बिगर कॉँग्रेसी सरकार, आणि राज्यात भाजपा सोडून असलेले इतर पक्षीयांचे सरकार अशा परिस्थितीत होना-या निवडणुका जनतेच्या हितास मारक की रक्षक हे पाहण्यासाठी निवडणुका होऊ द्याव्या लागतील. भाजपाची सूत्रे जेष्ठ लोकप्रतिनिधी आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, कॉँग्रेसकडून मंत्री बाळासाहेब थोरात, आ. लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सरचिटणीस अविनाश आदिक यांच्याकडे आहे, तर माजी आमदार भानुदास मुरकुटे हे कशा प्रकारे निर्णय घेतात, त्यासाठी काळ जाऊ द्यावा लागणार आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here