छोटा हत्तीच्या धडकेत तरूण ठार

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर : गोंधवणी रोडवरील डावखर मंगल कार्यालयाच्या नजीकच आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मालवाहू छोटा हत्ती या चारचाकी वाहनाच्या धडकेत प्रभाग नंबर 1, मिल्लतनगर येथील सोहेल शमशुद्दीन शेख (वय 27) या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला.
मयत हा प्लॉटिना मोटारसायकलवरून पुणताब्याकडून श्रीरामपूरच्या दिशेने येत असताना श्रीरामपूरहून येणार्‍या मालवाहु छोटा हत्ती वाहनाने धडक दिली. या धडकेत शेख यांचा जागीच मृत्यू झाला. गाडी चालक गाडीसह फरार झाला आहे.
अपघात झाल्याची माहिती कळताच संरपच भारत तूपे दाखल होत सदरच्या घडलेल्या घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोलिस दाखल होत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाचा तपास घेतला असता मालवाहू छोटा हत्ती पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलिस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here