मुलगा झाल्याच्या आनंदात ‘त्याने’ वाटले गावभर पेढे, तो निघाला कोरोना बाधित, गाव हादरले, 116 जण क्वारंटाईन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मुलगा झाल्याच्या आनंदात एकाने गावभर मित्रांना पेढे वाटले. मात्र त्याचा हा आनंद औटघटक्याचा ठरला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील काटकळंबा हे संपूर्ण गाव हादरले असून गावातील 116 जणांना क्वारंटाईन करण्यात आले.

प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आहे. गावात आरोग्य कर्मचारी पथक, पोलीस, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे.

काटकळंबा येथील एक 24 वर्षीय तरुण औरंगाबाद येथील एका कंपनीत नोकरी करतो. त्याला 4 जुलैला मुलगा झाला. त्यामुळे तो आपल्या गावी आपल्या कुटुंबाला भेटायला आला. यावेळी त्यांने आनंदाच्या भरात गावातील सर्व मित्रांना पेढे वाटले. तर आपल्या आजोळी आपल्या मामा-मामींचीही भेट घेतली. त्यानंतर त्रास होत असल्याने त्याचा स्वॅब पाठविला असता तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. ही घटना गावात वा-यासाहखी पसरली अन् गावक-यांची झोप उडाली.

दरम्यान, या व्यक्तीच्या घराचा संपूर्ण परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या माणसाच्या संपर्कात आलेल्या नाव्ही व त्याकडे आलेल्या गि-हाईकांचाही स्वॅब पाठविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here