Rahuri : पोलीसांची चोरलेली दुचाकी सोडण्यासाठी चोरट्यांबरोबर सौदेबाजी; कायद्याच्या रक्षकाचे चोरट्यांपुढे लोटांगण

प्रतिनिधी | राजेंद्र उंडे | राष्ट्र सह्याद्री  

राहुरी तालुक्यात चोरट्यांनी उपद्रव नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असून त्याची दखल कायद्याचे रक्षक घेत नाही. यावेळी माञ उलटे झाले. राहुरी पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेल्या दोन पोलीसांच्या दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या दुचाकी सोडविण्यासाठी या दोन पोलीसांना चक्क चोरांबरोबर सौदेबाजी करावी लागली. चोरांनी मागितलेली रक्कम पोलीसांना द्यावी लागली. चोरट्यांनी पोलिसांना सोडले नाही. कायद्याचे रक्षक चोरट्यांना घाबरु लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी न्याय मागायचे तरी कोणाकडे? असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. 

राहुरी तालुक्यात दुचाकी चोरी, घरफोडी, दुकानफोड आदी प्रकार सातत्याने घडतच आहेत. बारागाव नांदूर गावामध्येही दुचाकी चोरांची सौदेबाजी चांगलीच वाढल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात मोबाईल दुकानांसह छोट्या मोठ्या दुकानांवर चोरट्यांनी डल्ले मारत व्यापार्‍यांचे नुकसान केले. तसेच बारागाव नांदूर गावामध्ये शेतकर्‍यांच्या वीज पंप व केबल चोरीच्या घटना सातत्याने सुरूच आहेच. नुकतेच मंडलिक आखाडा परिसर येथील राजेंद्र मंडलिक यांच्या घरासमोरून शेळी, बोकड व दोन कोंबड्या चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. तसेच गावामध्ये घरासमोरून दुचाकी चोरून नेण्याचा गोरखधंदा सुरू केलेला आहे. रात्री गाडी चोरून नेल्यानंतर सकाळ होताच सौदेबाजी करायची. सौद्यानुसार 3 ते 5 हजार रूपये रक्कम घेत चोरलेली दुचाकी आणून दिली जात आहे. पोलिसांकडे गेल्यास दुचाकीचे नुकसान करण्याची धमकीही दिली जाते.

याप्रमाणे राहुरी तालुक्यामध्ये चोरट्यांचे मनोबल चांगलेच वाढत चालले आहे. परिणामी सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. व्यापार्‍यांसह शेतकरीही चोरट्यांमुळे त्रस्त आहे. शेतकर्‍यांचा शेतमालासह वीज पंप व केबल चोरण्याच्या घटनाही वाढलेल्या आहेत.

याबाबत पोलिस प्रशासनाने उचित उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. दुचाकी चोरी गेल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यास पोलिसांकडूनच सौदे करणाऱ्यांशी संपर्क साधण्याचे सांगितले जात असल्याचे पीडित व्यक्तींनी सांगितले आहे. यामुळे पोलिस प्रशासनानेही चोरट्यांच्या उपद्रवापुढे हात टेकल्याचे दिसून येत आहे. राहुरीत वाढलेल्या चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोन पोलीसांच्या दुचाकीची चोरी झाली. नेहमीप्रमाणे पोलीसांनी पाहिजे त्या ठिकाणी शोध घेतला. परंतू शोध काही लागेना. चोरट्यांनी त्या पोलीसांना भ्रमणभाष करुन दुचाकी पाहिजे का? सांगितलेल्या ठिकाणी दोन्ही दुचाकीचे 10 हजार रुपये सांगितलेल्या ठिकाणी ठेवण्यास सांगितले. पोलीसांनी सांगितलेल्या ठिकाणी दोन्ही पोलीसांनी 10 हजार रुपये ठेवले. ठराविक अंतरावरुन चोरट्यांनी टेहळणी करुन पुन्हा भ्रमणभाषवर संपर्क साधून अमूक ठिकाणी तुमच्या दोन्ही दुचाक्या लावलेल्या आहेत. तेथून घेऊन जाव्यात. असे बोलणे झाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणाहून दोन दुचाकी ताब्यात घेऊन सुटकेचा निश्वास टाकला. परंतू कायद्याचे रक्षकच सौदेबाजीला बळी पडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चोरीचा तपास कोण लावणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

चोरट्यांचा दोन पोलीसांना दणका

राहुरी शहरातून पोलिसांच्या दोन दुचाकी चोरीला गेल्या. त्यांचा तपास पोलीसांना लावता आला नाही. अखेर दुचाकीचा तपास लागत नाही. हताश होऊन चोरट्यांच्या हस्तकांशी संपर्क साधून दुचाकीचा शोध घेण्यास सांगितले. अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी त्या दोन्ही पोलीसांशी  भ्रमणभाषवर संपर्क साधला 10 हजाराची रक्कम अमुक ठिकाणी ठेवण्यास सांगितले. रक्कम मिळाल्यानंतर दुचाकीचा ठावठिकाणा सांगण्यात येईल.असे चोरट्यांनी सांगितले. अखेर दुचाकीचा तपास  सौदेबाजांकडून लावण्यात आला. चोरट्यांनी पोलिसांना सोडले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी न्याय मागायचे तरी कोणाकडे? असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here