Shrirampur : दुकान चालकाच्या खिशातून मोबाईल चोरी 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – तालुक्यातील उक्कलगाव येथील किराणा दुकान चालक सुहास बाबुराव फुलपगार रा. उक्कलगाव हा त्यांच्या दुकानात असताना विनानंबरच्या दुचाकीवर दोन जण तरूण आले त्यातील एक जण खाली उतरला व दुकानचालकाला तादूंळाची त्यांनी मागणी केली दुकान चालक वजनकाट्यावर तादूंळ मोजून देत असताना तेवढ्यात क्षणातच आरोपीने खिशातून मोबाईल हॅण्डसेट काढून चोरून नेला.
याआधी मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास डोळ्यादेखत चोरी झाली. मोबाईलची किमंत २१ हजार रूपये इतकी आहे. आरोपी हे बेलापूर दिशेने धूमस्टाईल पसार झाले. सुहास फुलपगार या तरुणाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भा.दि.कलम ३९२ / ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोनि श्रीहरि बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि समाधान पाटील हे पुढील तपास करत आहे. श्रीरामपूरसह, ग्रामिण भागात मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here