Kopargaon : अवैध दारू अड्डयावर पोलिसांचा छापा, गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू निर्मिती होत असल्याची गुप्त खबर कोपरगाव तालुका पोलिसांना लागली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी आरोपी संदीप उर्फ काळू ताराचंद वायकर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

राज्यात अवैध दारू उत्पादन,वाहतूक व विक्री मोठय़ा प्रमाणात होत असून या अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यासाठी प्रतिकात्मक कार्यवाही शासनस्तरावर केली जात आहे. यामध्ये आता ग्रामस्तरावर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले असून आता पोलिसांना व उत्पादन शुल्क विभागाला अवैध दारू रोखण्यासाठी ग्रामरक्षक दलाची मदत मिळत आहे. महामार्गावरील ५०० मीटर हद्दीत असणारे परमिट बार व वाइन शॉप दुकाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्यामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अनेक बार व दारू विक्री दुकाने बंद झाली आहेत.

मात्र, अवैध दारू विक्रीला सुगीचे दिवस आले की काय हे पाहण्याची वेळ आली आहे. नवीन कायद्यानुसार आता अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तीन गुन्हे दाखल केल्यावर हद्दपार केले जाणार आहे.अवैध दारू विक्री ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होते.अवैध दारू विक्री करणाऱ्यांची खबर ग्राम सुरक्षा दलाने केल्यास बारा तासाच्या आत कारवाई करणे दारू उत्पादन शुल्क यंत्रणेला बंधनकारक केले आहे. तरीही अवैध दारू बंद होण्याची चिन्हे नाहीत.
सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत याचा दाहक अनुभव आला आहे.तेथे अवैध दारू बनविण्याचे काम सुरु असल्याची गोपनीय खबर कोपरगाव तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अवैध दारू निर्मिती करणाऱ्यावर छापा टाकला असता ती खबर खरी निघाली आहे.पोलिसानी ५ हजार ३०० रुपयांची गावठी भट्टी व त्यातील ४० ली.दारू जप्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here