Rahuri : तालुक्यातील सोनगाव येथे कोरोना रुग्ण; रुग्णाचा तालुक्याशी संपर्क नसल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आज ९ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यात २१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे आणखी एक रूग्ण आढळून आला. मात्र, या रूग्णाचा राहुरी तालुक्यात कोणाशीही संपर्क आला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. 

आज दिनांक ९ जुलै रोजी अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर ग्रामीण हद्दीतील ६, नगर शहर हद्दीत ३, श्रीरामपूर तालुक्यात २, नेवासा तालुक्यात २, अकोले तालुक्यात १, संगमनेर तालूक्यात १, श्रीगोंदा तालुक्यात १, जामखेड तालुक्यात २, भिंगार येथे १ आणि कर्जत तालुक्यात १ तसेच राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे १ रुग्णाचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण २१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर सायंकाळच्या अहवालात संगमनेर तालुक्यात आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. राहुरी तालूक्यात आणखी एक रूग्ण आढळून आल्याची माहिती मिळताच तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, या कोरोना बाधित रूग्ण हा परदेशातून भारतात आला आहे. मुंबई येथे विमान तळावर उतरून तो थेट अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाला होता. दरम्यान, त्याची तपासणी केली असता तो कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. तो मुळचा सोनगाव येथील असला तरी त्याचा राहुरी तालुक्यातील कोणाशीही संपर्क झाला नाही. अशी माहिती समजली आहे. त्यामुळे सोनगाव सह राहुरी तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्वतःची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here