Newasa : चारिञ्याच्या संशयावरुन तीन दिवसाच्या चिमुकलीची बापाने केली हत्या

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
पत्नीच्या चारिञ्यवर संशय घेऊन पती-पत्नीच्या झालेल्या तडाख्याच्या भांडणात पित्याने तीन दिवसाच्या नवजात अर्भकाला दगडाने ठेचून या चिमुकलीची हत्या झाली. ही खळबळजनक घटना नेवासा तालूक्यातील मक्तापूर शिवारातील गाढवनाला परिसरात घडल्याने तालूक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सुञांकडून मिळालेली अधिक सविस्तर माहीती अशी, की स्वतःच्या तीन दिवसाच्या नवजात मुलीच्या(अर्भकाचा) पती-पत्नीच्या भांडणात डोक्यात दगडाचा जोराचा फटका बसल्याने या नवजात अर्भकाची हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेची माहीती नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रणजित डेरे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे व शेवगांव उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांना घटनेची माहिती देताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेत आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली.

यातील फिर्यादी नवजात अर्भकाची आई प्रिया अजय काळे (वय २०) व तीचा पती आरोपी अजय मिरीलाल काळे यांच्या मध्ये चारिञ्याच्या संशयावरुन गुरुवार (दि. ९ रोजी ) सकाळी ८ वाजता तडाख्याचे भांडण झाले.पती – पत्नीच्या झालेल्या जोरदार भांडणात पतीने पत्नीला मारहाण करुन तिथेच पडलेला दगड उचलून झोळीत झोपलेल्या बाळाच्या डोक्यात मारल्याने ही नवजात जखमी मुलगी काहीकाळ रडली व त्यानंतर तीचे रडणे बंद होवून मयत झाली.
त्यानंतर फिर्यादीची सासू, ननंद व सावञ दिर असे नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयीत नवजात अर्भकाला घेऊन आले असता येथील वैद्यकिय अधिक्षकांनी तिला मृत घोषीत केले. त्यानंतर या नवजात अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर आरोपीला नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक पी.के.शेवाळे व पो.कॉ. भागवत शिंदे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here