Karjat : दारुवरून हॉटेल चालकाने केलेली मारहाण सहन न झाल्याने इसमाची आत्महत्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ९

कर्जत – दारुच्या मागणीवरून हॉटेल चालकाने केलेली मारहाण सहन न झाल्याने एका इसमाने आत्महत्या केली. याप्रकरणी हॉटेल चालक व त्याच्या सहका-यावर गुन्हा दाखल केला आहे.

सहदेव रामचंद्र राऊत (वय – ४५, राहणार-चापडगाव,ता.कर्जत), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भरत श्रीरंग राऊत याने फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सतिष लक्ष्मण निंबाळकर, पांडुरंग सदाशिव निंबाळकर (दोघे रा.चापडगाव, ता.कर्जत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सहदेव हा हॉटेल चालक आरोपी सतिश याच्या हॉटेलवर जेवायला गेला होता. यावेळी मयत सहदेव याने आरोपी सतिशकडे दारूची मागणी केली. मात्र, सतिश याने दारू देण्यास नकार दिला. तसेच सहदेव याला आपला सहकारी पांडुरंग याच्यासह मिळून मारहाण केली.

त्यानंतर मयत सहदेव याने आपल्या चुलत भावाला फोन केला करून बोलावून घेतले. सहदेवचा चुलत भाऊ व त्याचा सहकारी याने सहदेवला रात्री उशिरा घरी सोडले. या घटनेनंतर दुस-या दिवशी सकाळी सहदेव याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने हॉटेल चालकाने केलेली मारहाण सहन न झाल्याने आपण आत्महत्या करीत आहोत, सुसाईड नोट लिहून ठेवली होती. जी पोलीस तपासात उघडकीस आली.

पोलिसांनी आरोपी सतिष व पांडुरंग दोघांवर भादवी कलम ३०६, ३२४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करीत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here