#GoodNews : Ahmednagar Corona MorningUpdates : जिल्ह्यात 36 रुग्णांची कोरोनावर मात 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर जिल्ह्यात आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५३० इतकी झाली आहे. आज नगर मनपा १३, संगमनेर १४, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासा येथील प्रत्येकी एक, कोपरगाव ०३ रुग्ण बरे झाले आहेत.
काल गुरुवारी रात्रीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात 66 रुग्ण सापडल्याने नगर शहरासह सर्व तालुक्यातील लोकांची चिंता वाढली होती. शहरात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण वाढत असले तरी त्यातल्या त्यात एक दिलासादायक चित्र आहे, कोरोनामुळे मृत्यू पेक्षा रुग्ण बरे होण्याचा दर जास्त आहे. आज 36 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here