Shevgaon : दिव्यांग कायद्यातील फेरबदल केंद्र शासनाकडून मागे – सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेची माहिती

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर जिल्ह्यातून नोंदवल्या गेल्या सर्वात जास्त हरकती 
शेवगाव – दिव्यांग कायदाचे कलम ८९,९२अ,व ९३ नुसार एखाद्या दिव्यांग व्यक्तीस हेतुपुरस्पर त्याच्या दिव्यांगत्वावरून अपशब्द वापरल्यास, त्याला अपमानास्पद वागणूक दिल्यास संबधीत व्यक्ती विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली जाऊन त्या व्यक्तीला कीमान सहा महीनेची शिक्षा होऊन त्याला आर्थिक दंडही केला जातो.
परंतु केंद्र सरकार यामध्ये वाढीव कलम ९५ अ आणून कायदा कुमकुवत करण्याचा प्रयत्न करत होते. कलम ९५ अ नुसार दिव्यांग व्यक्तीवर अन्याय झाल्यास त्याने दिव्यांग आयुक्ताकडे तक्रार दाखल करण्याची तरतूद होती. परंतु या बदलाला अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरातील दिव्यांगांनी तीव्र प्रकारे विरोध करून यावर हरकती नोंदवल्या दिव्यांगांचा वाढता विरोध पाहून केंद्र शासनाने सदर कायद्यामधील दुरूस्ती बदलमागे घेतला. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे चांंद शेख यांनी सांगितले.

राज्यभरातील दिव्यांगांनी या बदलाला तीव्र विरोध केल्याने सदर प्रस्ताव रद्द झाला दिव्यांग बांधवांनी दाखवलेल्या एकजुटतेमुळे हे शक्य झाले. यापुढेही दिव्यांगांनी अशीच एकजुटता दाखवावी. 
 – चांद शेख, उपाअध्यक्ष – सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था, अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here