Ahmednagar Breaking Crona Updates : जिल्ह्यात आज दुपारी आढळले १८ बाधित रुग्ण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील ०६, भिंगार ०७, संगमनेर ०१, शेवगाव ०१, पारनेर ०२ आणि राहाता येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आले.
नगर महापालिका क्षेत्रात पद्मानगर येथे ०३, टीवी सेंटर ०१, फकिरवाडा ०१. पाइपलाइन रोड ०१ रुग्ण आढळून आला.
भिंगारमधील गवळी वाडा येथे ०७ रुग्ण आढळून आले. संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथे एक रुग्ण आढळून आला.
पारनेर तालुक्यातील पारनेर शहर आणि भाळवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथे तर राहाता तालुक्यात पाथरे येथे बाधित रुग्ण आढळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here