Newasa : सोनईत लॉकडाऊनचा गडाखांनी घेतला आढावा

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनईमध्ये कोरोनाचे दहा रुग्ण बाधित सापडल्यानंतर शंकरराव गडाख यांनी सोनई गावात स्वतः जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. तर नागरिकांनी घाबरुन न जाता स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. शक्यतो विनाकारण बाहेर फिरु नका काल सोनईतून दहा जण बाधित सापडले असले तरी त्यातून ते सुखरूप बाहेर येतील, अशी आपेक्षा करुया असेही ते म्हणाले. 

यावेळी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, सोनई पोलीस
ठाण्याचे सपोनि सोनवणे तलाठी जायभाय व अधिकारी यावेळी उपस्थित होते. तहसीलदार सुराणा यांनी प्रशासन करत असलेल्या उपाय योजनेची माहिती गडाख यांना दिली. तर सोनईकरांनी संयम पाळून प्रशासनाला सहकार्य करुन
सोनई कोरोना मुक्त करु, असे आवाहन केले.

सोनई हॉटस्पॉट क्षेत्र घोषित

औरंगाबाद येथून सोनई येथे आपल्या मुलाच्या लग्नासाठी सोनई या आपल्या गावी आलेल्या ईसमाचा कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व त्याच्या सहवासात आलेल्या वीस जणांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये आठजण कोरोना मुक्त निघाले. परंतू दहा रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा आल्यानंतर नेवाशाचे तहसीलदार व आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी तातडीने सोनई येथे भेट देऊन बाधित दहा रुग्ण व त्यांचे कुटुंबातील सदस्य कोविड सेंटरमध्ये हवलले व सोनई गाव हॉटस्पॉट म्हणून घोषित केले.

त्या अनुषंगाने काल सकाळी सोनई गावातील सर्व रस्ते बंद केले असून अत्यावश्यक सेवे सहित सगळेच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी बाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले.

आज पुन्हा 102 जणांचे स्वॅब तपासणीसाठी

पॉझिटिव्ह 10 रुग्णांच्या संपर्कातील 102 रुग्णांचे स्वॅब आज तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here