Shrigonda : काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेमध्ये लाखोंचा घोटाळा

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चेअरमन व इतर दोघांवर गुन्हा दाखल…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीगोंदा – तालुक्यातील काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काष्टी या पतसंस्थेत ५४ लाख १८ हजार ४६ रुपयांची अफरातफर झाल्याने संस्थेचे चेअरमन ज्योती रमेश गवळी व त्यांचे पती रमेश गवळी व मॅनेजर भारत डोईफोडे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात उपलेखा परीक्षक सर्जेराव जामदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

काष्टी येथील धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन ज्योती गवळी त्यांचे पती रमेश गवळी व संस्थेचे मॅनेजर भारत डोईफोडे यांनी ठेवीदारांचा विश्वासघात करून संगनमताने ठेवीदारांनी संस्थेकडे जमा ठेवलेल्याठेवीच्या पैशातून ठेवीदारांचा विश्वासघात करून ५४ लाख १८ हजार ४६ इतक्या रकमेचा अपहार केला म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसातं शासकीय लेखापरीक्षक सर्जेराव जामदार यांनी तक्रार दाखल केली आहे . शासकीय लेखापरीक्षक जामदार यांना धनश्री महिला पतसंस्थेचे २६ सप्टेंबर २०१३ ते ३१ मार्च २०१८ मुदतीचे लेखापरीक्षण करण्याबाबत आदेश देण्यात आला.
यापूर्वीच ही अवसायनात काढली असल्याने अवसायक एस. एम शेलूकर यांनी संस्थेचे दप्तर उपलब्ध करून दिले. त्यानुसार संस्थेचे लेखापरीक्षण २८ फेब्रुवारी २०२० रोजी पूर्ण केले. त्यानुसार संस्थेच्या दप्तरामध्ये बनावट नोंदी घेऊन बनावट कागदपत्र तयार करून ठेवीदारांचा विश्वासघात करून ५४ लाख १८ हजार ०४६ रुपयांची अफरातफर केलेली आहे. ६५ रुपयांची ठेवीची रक्कम किदीमध्ये उशिरा जमा करुन व्याजाचे नुकसान केले. २ लाख ९५ हजार ९४ रुपये मुदत ठेवीची रक्कम किर्दीमध्ये उशिरा जमा घेऊन व्याजाचे नुकसान केले. ५० हजार रुपये ठेवीची रक्कम जमा दाखवली नाही. २२ लाख ७५ हजार रुपये विना कागदपत्राद्वारे रोखीने कर्ज नावे टाकून अपहार केला. एक लाख ६४ हजार रुपये ठेव पावत्यांची रक्कम जमा न घेता अपहार केला. एक लाख ५१ हजार रुपये संस्थेच्या चलनाने रक्कम भरणा केलेली असताना ती जमा १०० रुपये विना व्हाऊचर विना बिल रकम घेता अपहार केला.
१ लाख ३९ हजार रोखीने नावे टाकून अपहार केला. २ लाख ५५ हजार ६०५ रुपये व्हाऊचरवर सह्या नसताना रक्कम किर्दीमध्ये कमी जमा घेऊन अपहार केला लाख हजार १७ रुपये कर्जदाराची भरणा केलेली रक्कम किर्दीस कमी जमा अपहार केला. १ लाख हजार ५२० रुपये दैनिक ठेव, सेव्हिंग ठेव ठेवीदारांच्या खात्यात रक्कम जमा नसताना जादा रकम अदा केली. १ लाख ८५ हजार ७१० रुपये जाणूनबुजून संशयास्पद खर्च किर्दीस रोखीने नावे टाकले, असा ५४ लाख १८ हजार ४६ रुपयांचा अपहार करण्यात आला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here