Karjat : माहीजळगाव येथे शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

माहीजळगाव येथील भाऊसाहेब आश्रू कसाब – देशमुख (वय 60) या शेतक-याने नगर – सोलापूर हायवे नजीक असलेल्या स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी सातच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, भाऊसाहेब हे सकाळी शेतातील विहिरीतून पाणी आणतो, असे सांगून घरातून सायकलीवर निघाले. मात्र, ते परत आले नाही. बराच वेळ झाला ते कसे काय आले नाहीत. म्हणून घरात चलबिचल सुरू असताना एकाने ही दुर्घटना घरी सांगितली. या घटनेची माहिती समजताच पोलिस पाटील हनुमंत शिंदे यांनी पोलिसांना खबर केली.
घटनास्थळी पोलिस कर्मचारी ज्ञानदेव गर्जे व रविंद्र वाघ यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ सायकल उभा आणि त्यांनी शेजारील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दृश्य दिसले. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा अधिक तपास पोलिस हे.काॅ.प्रबोध हंचे करत आहेत.
कसाब यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन विवाहीत मुली असा परिवार आहे. कर्जत तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून या आठवड्यात ही चौथी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here