रवंदेत दोन गटात हाणामारी,दोन जखमी

0

राष्ट्र सह्याद्री

कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत येथील रहिवासी असलेले धीरज त्रिंबक काळे,विकास त्रिंबक काळे,त्रिंबक निवृत्ती काळे आदीं बाप-लेकांनी एकत्र येऊन जमीन वरकायद्याची मंडळी जमवून गज,काठी,लाकडी दांडा यांचा वापर करून आपल्याला मारहाण करून आपल्याला व आपल्या पत्नीला जखमी केल्याची फिर्याद भाऊसाहेब गंगाराम काळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे रवंदे परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी भाऊसाहेब काळे व आरोपी धीरज काळे राहातात. गुरुवार दि.९ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपी धीरज त्रिंबक काळे,विकास त्रिंबक काळे,त्रिंबक निवृत्ती काळे आदीं बापलेकांनी एकत्र येऊन गैर कायद्याची मंडळी जमवून गज,काठी,लाकडी दांडा यांचा वापर करून आपल्याला गज,काठी,लाकडी दांडा आदींचा वापर करून फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून आपल्याला व आपली पत्नी सोनाली भाऊसाहेब काळे हिला जखमी केल्याची फिर्याद भाऊसाहेब काळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.नं.१६२/२०२० भा.द.वि.कायदा कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चंद्रकांत तोर्वेकर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here