वाढीव वेळ देण्यास जिल्हाधिकार्यांचा नकार
राष्ट्र सह्याद्री
संगमनेर प्रतिनिधी : ‘अनलॉक 2.0’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील उद्योग-व्यवसायांना नियमांच्या अधीन राहुन सुट दिली आहे. त्या अनुषंगाने गुरुवार पासून राज्यातील बहुतेक ठिकाणी व्यवहार सुरु ठेवण्याची कालमर्यादा दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. मात्र सध्या नगर जिल्ह्यातील कोविडची स्थिती गंभीर असल्याने सदरची सुट नगरजिल्ह्यात लागू होणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी दिली.
देशभरात ‘अनलॉक 2.0’ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत बंद असलेल्या उद्योग-व्यवसायांना सुरु करण्यासोबतच यापूर्वी व्यवहार सुरु ठेवण्यासाठी देण्यात आलेली 9 ते 5 ही वेळ बदलून त्यात दोन तासांची वाढ करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (ता.9) संगमनेरातील अनेक भागातील व्यवहार सायंकाळी सात वाजेपर्यंत खुले होते. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील व्यवहारांना सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी असल्याचे जाहीर केले.
हा निर्णय सायंकाळी उशीराने झाल्याने त्याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचू शकली नव्हती, त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी सायंकाळी सात पर्यंत व्यवहार सुरु होते. मात्र तसे कोणतेही आदेश नसल्याने व्यापारी व अन्य व्यवसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील व्यवहार काही मुद्दे वगळता अनलॉक ‘1.0’ प्रमाणेच सुरु ठेवण्याची परवानगी असल्याने संगमनेर-अकोल्यातील व्यवहार, दुकाने व अन्य व्यवसाय सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरु ठेवण्याची मुभा आहे. त्यानंतर दुकाने सुरु ठेवणार्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले.

propecia drug – http://propechl.com/ does propecia regrow hair
order generic propecia – nebenwirkungen propecia finasteride tablets
generic tadalafil reviews – tadalafil prices liquid tadalafil