एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या

2

श्री संत सावता माळी युवक संघाचे तहसीलदारांना निवेदन

 राष्ट्र सह्याद्री
राहुरी प्रतिनिधी : मंठा (जि. जालना) येथे एकतर्फी प्रेमातून नववधूची धारदार शस्त्राने हत्या केल्याप्रकरणी घटनेचा जाहीर निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार राहुरी यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंठा (जि. जालना) येथील गरीब रिक्षा चालकाची मुलगी वैष्णवी गोरे हिचा नुकताच 5 दिवसांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर वैष्णवी ही मंठा येथील माहेरी आली असता गुंड शेख अल्ताफ बाबू याने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर धारदार शस्त्राने तिची हत्या केली. सदरील घटना ही काळीमा फासणारी असून या प्रकरणी सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करून सदर आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
निवेदनावर श्री संत सावता माळी युवक संघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, अजिंक्य मेहेत्रे, जीवन गुलदगड, जयश्रीताई व्यवहारे, दिपक साखरे, सुनिल शिंदे, हरिष मेहेत्रे, शुभम धाडगे, सचिन मेहेत्रे आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अन्नपुरवठा मंत्री व तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
Attachments area

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here