नात गायब करून पैसा उकळण्याचा फंडा अखेर उघड !

0

राष्ट्र सह्याद्री
कोपरगाव प्रतिनिध  :  तालुक्यातील इंदिरानगर या ठिकाणी राहात असलेल्या आपल्या अल्पवयीन नातीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेण्यात आल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या आजीने (वय-६५) दाखल केल्याने टाकळी परिसरात खळबळ उडाली असली तरी हि आजी अनेकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यानां आपली आर्थिक शिकार करीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.हा गौप्यस्फोट या आजीच्या श्रीरामपूर येथील मुलाने व नातीनेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन दिल्याने या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे.त्यामुळे यात शिकार झालेल्या अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कोपरगाव तालुक्यात टाकळी ग्रामपंचायत हद्दीत तक्रारदार महिला या आपल्या कुटुंबिया सोबत राहते.त्यांना एक नातं असून ती अल्पवयीन आहे.मंगळवार दि.७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तक्रारदार महिलेची (वय-६५) या महिलेची नात एकाएकी काही न सांगता बाहेर गेली असून तिचा शोध नजीकच्या नातेवाईकांकडे घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे या आजीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.त्यामुळे टाकळी व तालुक्यात या प्रकरणी खळबळ उडाली होती.या नंतर या घटनेचा कोपरगाव शहर पोलिसानी नोंद घेऊन या प्रकरणी शोध सुरु केला असता त्यांनी श्रीरामपूर येथील या गायब नातीच्या पित्याचा व बेपत्ता झालेल्या नातीचा शोध घेतला व त्यांना पोलिसी हिसका दाखवला असताना त्यांनीच या आजीचा बुरखा टराटरा फाडला आहे.क्षणभर पोलिसही या प्रकरणाने चक्रावून गेले होते.मात्र या आजीच्या मुलाने व नातीनेच,कोपरगाव शहर पोलिसांना या प्रकरणी हजर होऊन जबाब दिला असून आपण बाहेरगावी गेलो की,आजी असे प्रताप करून नजीकच्या तरुणांचे नाव पोलिसांना सांगायची व त्यांचे नाव वगळण्याची “बक्कळ कमाई” करण्याचा फंडा या आजीने सुरु केला होता.त्यातून अनेक तरुण बळी गेले असून त्यांचा खिसा आजीने रिकामा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here