Shrigonda : देवदैठण मारहण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक, उपोषणाचा इशारा

0
प्रतिनिधी | उक्कडगाव | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे झालेल्या जबर मारहाणीतील आरोपींना अटक व्हावी, यासाठी देवदैठण ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस  प्रशासनाविरुद्ध उपोषणाचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारची निवेदने वरिष्ठ पातळीपर्यंत देण्यात आली आहेत.

देवदैठण येथे दि .३ जुलै रोजी रात्री ९ वाजता सागर विश्वनाथ बनकर, गणेश ओहोळ, दादा ओहोळ, सागर ओहोळ, मोहन धोत्रे, आण्णा भडंगे यांनी गज, दांडके, बाटल्या यांच्या साहाय्याने सुमित वाघमारे, ओंकार वाघमारे, संतोष वाघमारे यांना अत्यंत निर्दयीपणे जबर मारहाण केली. यातील सुमित वाघमारे यास डोक्याला व मेंदूला जबर मार बसल्यामुळे तो जीवन मरणाची लढाई लढतोय तर ओंकार याचा हात मोडला असून डोक्याला मार आहे.
यापूर्वीही अशा घटनातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींकडून झाला आहे. विविध पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हे नोंदवलेले आहेत. या आरोपींना वेळीच पायबंद बसला नाही तर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल.
बेलवंडी पोलिसांमार्फत काही आरोपी पकडले गेले आहेत. परंतू उर्वरीत आरोपींना आठ दिवसात अटक करावी व सर्वांना कडक शिक्षा व्हावी व या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोपींच्या बाजूचे तरुण चिथावणीखोर भाषा वापरतात. त्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दि. १६ जुलैपासून उपोषणाचा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

मारहाणीत डोक्याला गंभीर इजा झालेला सुमित वाघमारे जीवन मरणाची लढाई लढतोय. तो बरा व्हावा यासाठी मोठा खर्च येणार आहे. गावातील तरुण एकत्र येऊन उपाचारासाठी आर्थिक मदत गोळा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here