Shrirampur :  मोबाईल फोन चोरणारे सराईत चोरटे गजाआड 

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चालाखीने मोबाईल चोरण्याचे प्रकार वाढले होते. अखेर या मोबाईल चोरट्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल तसेच एक प्लॅटिना गाडी जप्त करण्यात आली आहे.

शाहरुख अफसर शेख (रा. वॉर्ड नंबर 6), बाबर जानमंहमद शेख (रा. वाॅर्ड नंबर 2 श्रीरामपूर), अशी या सराईत चोरट्यांची नावे आहेत.

फिर्यादी सुहास बाबुराव फुलपगार (रा. उक्कलगाव तालुका श्रीरामपूर) यांच्या शर्टच्या खिशातून 21 हजार रू किमंतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन (दि.7) एका विनानंबर प्लॅटिना गाडीवरून येऊन दोन इसमांनी बळजबरीने हिसकावून नेला होता. यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 1103/2020 भा.दं.वि. कलम 392/ 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास केला असता तो श्रीरामपूर शहरातील सराईत गुन्हेगार शाहरुख याने साथीदार बाबर यांच्यासह चोरुन नेला असून त्यांच्याकडे एका चोरीची मोटारसायकल आहे. हे आरोपी बसस्टॅण्ड परिसरात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे डी बी पथकाचे पो हे काॅ जे के लोंढे, पो काॅ अर्जून पोकळे, पो काॅ पंकज गोसावी, पो काॅ सुनिल दिघे, पो काॅ किशोर जाधव, पो काॅ गणेश गावडे, पो काॅ महेंद्र पवार यांच्या पथकाने बसस्टॅण्ड परिसरात सापळा लावून  दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोबाईल व प्लॅटिना मोटारसायकलबाबत चौकशी केली असता ते चोरीचे असल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून गुन्ह्यातील 21 हजारचा रू किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन, या गुन्ह्यात वापरलेली 25 हजार रू किंमतीची एक विनानंबरची प्लॅटिना मोटारसायकल असा 46 हजार रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या मोटारसायकल बाबत अधिक तपास पोलिस करत आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर डाॅ दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने,श्रीरामपूर विभाग यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस श्रीहरि बहिरट यांचेसह सपोनि समाधान पाटील तपास पथकाचे पो काॅ जे के लोंढे,पो काॅ.पंकज गोसावी पो काॅ किशोर जाधव पो काॅ अर्जून पोकळे सुनिल दिघे महेंद्र पवार गणेश गावडे अंबादास आंधळे यांनी कारवाई केली आहे.
सराईत गुन्हेगारांवरील यापूर्वीचे दाखल गुन्हे 
आरोपी – *शाहरुख अफसर शेख* रा वॉर्ड नंबर 6 खालील दाखल गुन्हे 
श्रीरामपूर शहर पो ठाण्यात गुं. रं.नं. 18/2015 भादंवि कलम 392/34,प्रमाणे,गु.र.नं. 31/ 2016 भादंवि कलम 392 प्रमाणे, गु. र.नंबर 73/2015भादंवि कलम,379/ 34 प्रमाणे, गु र नंबर 297/2015 भादंवि कलम 394/ 34 प्रमाणे गु.र.नंबर 78/2018 भादंवि कलम 379 प्रमाणे श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आरोपी – *बाबर जानमंहमद शेख* रा वाॅर्ड नंबर 2 श्रीरामपूर 
श्रीरामपूर शहर पो ठाण्यात दाखल गुन्हे 
गु.रनं 110/2009 भादंवि कलम 392/ 340 प्रमाणे, गु र नंबर 73/2015 भादं वि कलम, प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here