प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

140 नंबर वरून येणारा कॉल रिसिव्ह केल्यास तुमच्या बँक खात्यातील रक्कम शून्य होते, या क्रमांकाचे फोन उचलू नका, हा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मात्र, या संदेशात तथ्य नाही. मात्र, तुम्हाल कोणी ओटीपी किंवा अन्य बँक डिटेल्स विचारल्यास देऊ नका, पासवर्ड सांगितल्यास बँके अकाउंट रिकामे होऊ शकते, त्यामुळे पासवर्ड सांगू नका असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने ट्विटरद्वारे केले आहे.
पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की 140 नंबरने सुरुवात होणारे कॉल विविध कंपन्यांना त्यांच्या प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी दिलेल्या असतात. त्याचा बँकेच्या अकाऊंटशी संबंध नसतो. मात्र या कॉलवरून कोणी तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स जसे अकाउंट नंबर, पासवर्ड, ओटीपी विचारत असेल तर लगेच सावध व्हा. त्यांना कोणत्याही प्रकारचे पासवर्ड सांगू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने केले आहे.