Shirdi : साई मंदिरात प्रशासनाचे संकटकालीन बचाव प्रशिक्षण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिर्डी : राज्यभरात नव्हे तर देशात करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साई मंदिर हे नेहमीच अनैसर्गिक धोक्यांच्या घटकेला अडकू शकते. त्या पार्श्वभूमिवर साई मंदिर परीसरात बॉम्बसदृश्य वस्तू ठेवून ती मंदिर सुरक्षेच्या यंत्रणेकडून तपासली गेली आणि त्या दरम्यान साई मंदिर परीसरात काहीकाळ भितींचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे अचानकपणे शिर्डीतच एकच गोंधळ उडाला. मात्र, हे साई मंदिराचे सुरक्षासाठी प्रशासनाचे केलेले संकटकालीन बचाव प्रशिक्षण होते.

जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेख कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दीपाली काळे यांच्या मार्गदर्शक सूचनेवरून शिर्डीच्या साई मंदीर सुरक्षेच्या यंत्रणा हया सजग आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी अचानकपणे पोलिसांनी मंदीर परीसरात एक बनावट बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवण्यात आली. आणि ही खबर शिर्डीच्या सुरक्षेयंत्रणेला बॉम्ब पथक, महसूल पथक यांना देण्यात आली. त्यांनतर सर्वच सुरक्षे कार्य करणाऱ्या विविध विभाग मंदीर परीसरात दाखल झाल्या. ती ठेवण्यात आलेली ती वस्तु शोधण्यात आली.

तोपर्यंत मंदिराकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या आमजनतेपासून लपवून राहू शकल्या नाही. वेगवेगळे कयास लावले जाऊ लागले. अफवा अशा पसरल्या की, कोरोनाचे रुग्ण वाढले की, सगळ लॉकडाउन होणार. त्यामुळे अचानकपणे किराणा दुकानात आणि भाजीपाल्याच्या दुकानात गर्दी वाढली. नंतर याचा संकटकालीन बचाव पथकाच प्रशिक्षण होत. त्यामुळे नागरीकांचा हिरमोड झाला.

याप्रसंगी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, नगरपंचायतीचे अधिकारी, संस्थानचे सुरक्षारक्षक व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here