Sangamner Corona Updates : आज नव्याने 16 कोरोना बाधित रुग्ण

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरकरांना आज कोरोनाने जोरदार धक्का दिला असून नगर रुग्णालयासह खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेरात नव्याने 16 रुग्णांचे  अहवाल पॉजीटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील पंजाबी कॉलनीतील पाच जणांचा समावेश आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन अंकी संख्येत रुग्ण वाढ झाल्याने तालुक्यातील बाधितांचे संख्या 223 वर पोहोचली आहे. त्यामुळे संगमनेरकर आता खरोखरच हादरले आहेत.

आज बाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनीतील 63, 48 व 45 वर्षांच्या महिलांसह 58 व 32 वर्षीय पुरुष तर नवघर गल्लीतून 60 वर्षे वयाच्या व्यक्ती, विठ्ठलनगर परिसरातील चाळीस वर्षे वयाच्या तरुणालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच तालुक्यातील खांडगाव येथील 18 वर्षीय तरुण, नान्नज येथील 46 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष तर चिखली येथूनही पहिल्यांदाच 38 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शहरालगतच्या घुलेवाडीगाव तुन 49 व 36 वर्षे व्यक्ती तसेच निमोण येथील 52 व 52 वर्षे व्यक्तीला कोरोनाची व बाधा  झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे.

आजच्या एकूण 16 पैकी दहा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयातून तर सहा खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाले आहेत. आज पुन्हा सलग दुहेरी संख्येत रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुक्याची कोरोना बाधित  रुग्ण संख्या 223 तेवीस वर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here