Sushant Singh Rajput Case : मुंबई पोलिस करताएत छुपी चौकशी, पोलिसांच्या भूमिकेवर अनेकजण नाराज

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी आधी 30 जणांचे खुले जबाब नोंदवल्यानंतर मुंबई पोलिस आता छुपी चौकशी करीत आहेत. पोलिस आता छुप्या पद्धतीने जबाब नोंदवत आहेत. सलमान खान यांच्याशी संबंधित असलेल्या सुषमा शेट्टी यांचा असाच छुप्या पद्धतीने जबाब नोंदवण्यात आला. 

30 जणांचे खुले जबाब

हा तपास वांद्रे पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत सुमारे 30 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत पोलीस ज्याचा जबाब घ्यायचा आहे, त्या व्यक्तीला वांद्रे पोलीस स्टेशन येथे बोलवायचे आणि त्यानंतर त्याचा जबाब घ्यायचे. अशा पद्धतीने 30 जणांचे जबाब घेण्यात आले आहेत.

मात्र, सुषमा शेट्टी यांच्या नोंदवण्यात आलेल्या छुप्या पद्धतीच्या जबाबामुळे अनेकांनी वांद्रे पोलिसांवर टिका केली आहे. तसेच त्यांच्या भूमिकेवर अनेकजण नाराज आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here