Pune : साखर आयुक्तपदी पुन्हा शेखर गायकवाड; कृषी आयुक्त सुहास दिवसे यांचीही बदली 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची बदली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या सीईओपदी झाली आहे. राज्य सरकारने शनिवारी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. 

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पीएमआरडीएचे सीईओ विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड यांची अवघ्या तीन महिन्यातच बदली करण्यात आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या शनिवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांना पुन्हा एकदा साखर आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे. तर सध्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांना पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या ओएसडीपदी पाठविण्यात आले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त तथा सीईओ विक्रम कुमार यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर विक्रम कुमार यांच्या पदावर कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना पाठविण्यात आले आहे. तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि मंचर उपविभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र दुदी यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या कृषी आयुक्त पदावर आता कुणाची वर्णी लागते राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here