Rahuri : राजकीय अन् शिक्षण क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव; 45 जणांना केले क्वॉरंटाईन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे दोघांना तर म्हैसगाव येथे एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याची स्ञाव तपासणीतून निष्पन्न झाले आहे. राहुरी फॅक्ट्री येथील एकाच कुटुंबातील चौघांना तर राहुरीत राजकीय अन शिक्षण क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे 45 जणांना क्वारंटाईन केल्याची माहिती तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून राहुरी तालुक्यातही कमी प्रमाणात का होइना रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. खासगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर तांदुळवाडी येथील दोघांना तर म्हैसगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. तांदुळवाडी येथील दोघे राजकीय क्षेत्रातील तर म्हैसगाव येथील शैक्षणिक क्षेत्राशी संबधित व्यक्ती असल्याचे समजते. खबरदारी म्हणून या गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान राहुरी बुद्रुक, चिंचविहीरे, वांबोरी, ब्राम्हणी येथील एकूण चौघा जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, हे सर्व निगेटिव्ह आले असल्याने या गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर तालुक्यातील अन्य १० जणांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत.

यावेळी तहसीलदार एफ आर शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे, विलास गागरे, सरपंच महेश गागरे, ग्रामसेवक शिवाजी पटेकर, तलाठी काशिनाथ परते, मंडलाधिकारी गोसावी,  तंटामुक्ती अध्यक्ष गहिनीनाथ हुलूळे आदी उपस्थित होते.

“तांदुळवाडी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याची शक्यता म्हणून राहुरी फॅक्टरी येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरंटाइन करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे एक व्यक्ती कोरोना बाधित आढल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कासतील तब्बल ४५ जणांना कोरंटाइन केले आहे. गावातील ४५ जणांना रूग्णवाहिकेतून नेले गेले असून घशातील स्त्राव घेऊन राहुरी कृषी विद्यापीठ येथे विलगिकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.”

राहुरीत कोरोना प्रतिबंधासाठी उपाय योजना करताना तहसीलदार शेख  पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here